Life teaches us many things every time.
Important to remember what is permanent and what is temporary.
Like, Comment and Share
Thank You
- Saka
29 Nov 2021
Gratitude and Affirmations
Gratitude and Affirmations for healthy body
25 Oct 2021
Wellness Affirmations
स्वस्थ आणि निरोगी आयुष्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना
5 Feb 2021
Affirmations
Affirmations change my life
24 Oct 2020
कासा Wellness _ Health & Happiness
स्वस्थ आणि आनंदी राहण्याचे 80-20 सूत्र
16 Oct 2020
1
1
12 Sept 2020
आचार्य चाणक्य
व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही तो त्याच्या कर्माने महान होतो
अखंड भारताची संकल्पना सर्वात आधी मांडणारे,
सम्राट सिकंदराला भारत जिंकण्यापासून रोखणारे,
राजनीती आणि कूटनीती या महत्वपूर्ण ग्रंथांची रचना करणारे
धनानंद याचे कुशासन मोडून काढणारे,
आपल्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर भारताचा इतिहास बदलून टाकणारे
एका सामान्य बालकास महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनवणारे
'चणक' या प्रतिभावान शिक्षकांचे सुपुत्र विष्णुगुप्त, कौटील्य
एक साहित्यकार, शिक्षक, दर्शनशास्त्री, राजनीती तज्ञ
तक्षशीलेच्या गुरुकुलातील अर्थशास्त्राचे आचार्य
आचार्य चाणक्य
11 Sept 2020
सकारात्मक
सकासोबत सकारात्मक सकाळ
5 Sept 2020
शिक्षक 🙏
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
अमर्याद ज्ञान देतात ते शिक्षक
योग्य दिशा दाखवतात ते शिक्षक
आयुष्याला आकार देतात ते शिक्षक
एका अजाण बालकाचे देशाच्या उत्कृष्ट नागरिकामध्ये परिवर्तन करतात ते शिक्षक
सुसंस्कृत समाज घडवतात ते शिक्षक
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देतात ते शिक्षक
सकारात्मक ऊर्जा देतात ते शिक्षक
सदैव प्रोत्साहन देतात ते शिक्षक
शाबासकीची थाप देतात ते शिक्षक
अपूर्णाला पूर्ण करतात ते शिक्षक
तत्वातून मूल्ये फुलवतात ते शिक्षक
अश्या शिक्षकांना मी सचिन कासा नमन करतो.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षकांची भूमिका आणि कार्य अमूल्य असते
मी मला घडवणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार मानतो
सर्वप्रथम त्या निसर्गाचे, विधात्याच, निर्मात्याचे त्यांनी मर्यादा शिकवली त्यांचे आभार
त्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार शिकविले त्यांचे आभार
माझ्या प्राथमिक माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षणामध्ये अमर्याद ज्ञान देणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार
मला माझं अस्तित्व निर्माण कार्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या गुरूंचे आभार
तुम्हा सर्वांकढुन मी खूप काही शिकत आहे तुम्हा सर्वांचे आभार
असंच मार्गदर्शन करत रहा ......
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
27 Aug 2020
आयुष्यातील तुमचा जोडीदार कोण?
आयुष्यातील तुमचा जोडीदार कोण?
26 Aug 2020
Welcome msg
Welcome in कासा Wellness
9 Aug 2020
गैरसमज
गैरसमजातून बरीच नाती तुटतात. आपल्या जवळच्यांना सांगा.
'गैरसमज'
गैरसमज नखाएवढा,
होतो नको एवढा.
मनामध्ये शंकेचा कल्लोळ अन विचारांचा काहूर,
काळजा जवळच्या जिवाभावाला, क्षणातचं करतो दूर.
संपवून टाकतो विश्वास, जपलेला जो आयुष्यभर,
विचारही करत नाही कि तो का जपला मग आजवर.
का हा समज नाही, कि हा गैरसमज गैर आहे.
अन त्याचं होणं, हे समजुतीचंच एक वैर आहे.
ना कोणते प्रमाण आहे, ना ही याला काही बूड आहे,
आपुल्या आपुलकीला, अगतिकतेचा हा तर सूड आहे.
काळजाचा घाव, असा कसा सोसावा,
म्हणूनच तर तुझ्यामाझ्यात, हा कधीच नसावा.
31 Jul 2020
सत्य असत्य
जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवीन सत्य समोर येते. अगदी अनपेक्षित जसा आपण विचारही नाही करु शकत.
सत्य असत्य अगणित आहे त्याचा हिशोब करणं कठीण आहे.
आभासी, कल्पनेच्या दुनियेत जगत असताना आपण हे मात्र विसरता कामा नये की आत्म्यास ठेच लागेल असे सत्यही नको आणि असत्य ही नको.
आत्मा सत्य आहे आणि सत्य अमर आहे.
17 Jul 2020
गाडी सुटली रुमाल हलले
हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना...
17 Jul 2020
Lockdown एक अवसर
Lockdown मे हम क्या क्या कर सकते हैं? ये बताया है.
17 Jul 2020
मी
इथे मी म्हणजे मी नाही. कोणत्यातरी एका वाक्याला तुम्हीही relate नक्कीच करू शकाल.
16 Jul 2020
पालवांचे ठसे (Trailer)
16 Jul 2020
निस्वार्थी मित्र 🎶✒️
माझे निस्वार्थी मित्र जे मला सदैव साथ देतात.
माझ्या प्रत्येक सुख दुःखात सदैव माझ्या सोबत असतात,
मला अभिमान आणि गर्व वाटणारा माझा विजय तेच साजरा करतात,
माझ्या अयशस्वी संघर्षात मनाला झालेल्या असह्य जखमा तेच भरतात,
मनामधील कल्लोळ शांत करतात आणि एकटेपणाच्या शांततेत कल्लोळ करतात,
मला मंत्रमुग्ध करतात आणि ओढ लावतात, आई सारखे प्रेमळ आहेत, बाबांसारखे आधार देतात, ताईसारखे प्रोत्साहित करतात, मित्रांसारखे सोबत देतात आणि माझ्या स्वप्नातल्या परी इतके सुंदर आहेत.
धावपळीच्या जगात त्यांच्या कवेतच मी काही क्षण विसावतो.
जिज्ञासेने मग मी स्वतःलाही विसरतो. त्यांच्यासारखे असावे सर्वांनी असेच वाटते.
ना अपेक्षा, ना उपेक्षा, ना स्पर्धा, ना कुछ कम ना कुछ ज्यादा....
वंदन करतो त्या निर्मात्याला ज्यांनी त्यांना निर्माण केले.
त्यांनीच आईची आठवण होते, त्यांनीच प्रेमाची साठवण होते.
माझं प्रेम, माझं स्वप्न, माझं हसणं, माझं रडणं, माझं रुसणं, माझ्या भावना, माझ्या यातना, माझ्या कल्पना ...... तेच व्यक्त करतात. असे माझे मित्र 'शब्द'. जेव्हा मी असतो स्तब्ध तेव्हा बोलतात ते फक्त शब्द. धन्यवाद 🙏
Host of पालवांचे ठसे?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.