Podcast thumbnail for Er Priti More

Er Priti More

Claim This Podcast

by Priti More

31 episodes
Updated Daily
Accepts GuestsHas SponsorsLocation 🇮🇳

Podcast Overview

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल. या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे. मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता https://www.youtube.com/@PritiMore धन्यवाद!

Language

Publishing Since

6/28/2020

1 verified contact email on file for Er Priti More

Pitch yourself as a guest, propose sponsorships, or reach out directly to the host.

Recent Episodes

Episode thumbnail for श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹

January 15, 2023

श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹

*🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹*

*आजचा फकीर हा उद्याचा राजा होऊ शकतो आणि आजचा आजचा राजा उद्या भिखारी होऊ शकतो*

अरे स्वामीनंवरचा विश्वास उडवुन जाऊ देऊ नकोस* *मनात कदापि हा विचार आणू नकोस स्वामी नाहीत* *अरे ज्याच्या अज्ञेशिवाय झाडाचे पान सुध्दा हालत नाही मग कशामुळे आपण असे म्हणायचे स्वामी नाहीत ते अरे संपतील रे तुझे ही,दुःख अडचणी होईल रे सर्व ठिक झाले गेले सर्व विसरून जा मनापासुन स्वामीनंचरणी शरण जा मनापासून त्यांना विनंती कर मनोभावे सेवा सुरू कर स्वामीनंवरील विश्वास भक्कम कर अरे नक्कीच तुझे सर्व प्रश्न ,दुःख ,अडचणी संपल्या जातील ब्रम्हांड नायक कोणतेही संकट थोपवु शकतात मग आपले दुःख ,संकट त्याच्या पुढे काय होईल रे सर्व ठिक काळजी नको रे करू*

Episode thumbnail for सुंदर विचार

August 6, 2022

सुंदर विचार

खुप छान नक्की वाचा . .✍✍🏼 ⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 📃✍🏼 *नारायण मूर्ती* . . ⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. 📃✍🏼- *स्वामी विवेकानंद*✨ . . ⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- 📃✍🏼 *विश्वनाथन आनंद*⚡ . . ✍🏼⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍🏼 *धीरूभाई अंबानी* . . ✍🏼⚡5) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. 📃✍🏼-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡ . .✍🏼⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... 📃✍🏼 -- *डाॅ. अब्दुल कलाम* . .✍🏼⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. 📃✍🏼 - *बिल गेट्स* . . ✍🏼⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. 📃✍🏼 - *कल्पना चावला* . .✍🏼⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. 📃✍🏼-- *बराक ओबामा* . ✍🏼⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. 📃✍🏼 -- *आयझॅक न्यूटन* . . ✍🏼⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. 📃✍🏼 -- *सर्वपल्ली राधाकृष्णन*

Episode thumbnail for स्त्री सूक्त माहात्म्य

August 5, 2022

स्त्री सूक्त माहात्म्य

*।। श्री स्वामी समर्थ ।।* 🪷 *श्रीसूक्त महात्म्य* 🪷 श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या परिशिष्टात समाविष्ट आहे. यामध्ये मूळ १५ ऋचा, १ फलश्रुतीची ऋचा आणि शिवाय १ स्वतंत्र फलश्रुती आहे. या स्वतंत्र फलश्रुतीमध्ये ९ ऋचा व १ लक्ष्मी-गायत्री यांचा समावेश आहे. श्री मध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या सर्व गोष्टी मानवाच्या समृद्ध जीवनाला आवश्यक आहेत. आयुष्य भरपूर आहे परंतु निरोगी नाही, निरोगी आहे परंतु पुत्र नाही, धन नाही, वाडवडील लवकर निवर्तले, सत्ता कोठेही नाही असे असले तर माणसाला जिणे नकोसे होईल. श्री मध्ये या गोष्टींचा समावेश आहे. व्यवहारात लक्ष्मी म्हणजे पैसा, असा अर्थ आहे पण तो श्री या पदाचा मात्र नाही ! श्री या एका पदामध्ये ज्या गुणांचा किंवा वैभवाचा समावेश आहे त्याबद्दल फलश्रुतीमध्ये एक ऋचा समाविष्ट आहे ती पुढील प्रमाणे :- *श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ।* *धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।* या सुक्ताचे ऋषी :- लक्ष्मी, आनंद, कर्दम, चिक्लीत आणि इंदिरासुत असे आहेत. या सुक्ताची देवता लक्ष्मीनारायण असे मानण्यात येते. श्रीसूक्ताचा उपयोग संसारी आणि पारमार्थिक जीवनात कसा करावा हे माहीत असणे आवश्यक ठरते. हे सूक्त साधकाला पैसा प्रदान करते अशी समजूत असली तरी केवळ पैशाच्या प्राप्तीसाठी या सुक्ताचा पाठ करणे उचित नाही. *प्रापंचिक ऐश्वर्याच्या मागे जी पारमार्थिक समृद्धी दडली आहे त्याचा विचार करणेही योग्य ठरते.* श्री या पदाच्या विस्तारात ऐश्वर्याची स्वामिनी म्हणून महालक्ष्मी गौरविली जाते. या अंबामाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवतेचे स्थान म्हणजे कोल्हापूर ! भक्तांचे आर्त पूर्ण करण्यासाठी ती त्या ठिकाणी प्रदीर्घकाळ तिष्ठत आहे. सामान्य साधकासमोर मूर्ती असल्याशिवाय उपासना होत नाही. म्हणून प्रारंभिक अवस्थेत मूर्ती समोर ठेवून पूजा - प्रार्थना केली जाते. या सर्व उपासनांचा केंद्रबिंदू महालक्ष्मी, श्रीसूक्त किंवा श्रीयंत्र हे आहेत ! मंत्र, तंत्र आणि यंत्र हे तीन उपासनेचे भाग आहेत. १५ ऋचांपर्यंत श्रीसूक्ताचा पाठ केला जातो. या पुढील ऋचा फलश्रुती म्हणून गणली जाते. जो कोणी नियमितपणे नित्य श्रीसुक्ताच्या १५ ही ऋचांचा पाठ करील अगर तुपाच्या साहाय्याने मंत्रांच्यायोगे हवन करील त्याला सर्वसंपन्नता प्राप्त होईल. प्रापंचिक सुविधा लाभावी म्हणून मानवाचा प्रयत्न चालू असतो परंतु यासाठी माणूस जे प्रयत्न करतो त्याचे अधिष्ठान परमेश्वर असते. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा हा एक स्वतंत्र मंत्र आहे. श्रीमद् भागवतगीता, सप्तशती या ग्रंथातील प्रत्येक श्लोक जसा स्वतंत्र मंत्र आहे तसे श्रीसूक्ताच्या १५ ऋचांचे आहे. *मंत्राच्या व्यावहारिक अर्थापेक्षा पारमार्थिक अर्थ आणि त्यापेक्षाही त्या मंत्रातील अक्षरांच्या उच्चारामुळे निर्माण होणारे नादतरंग यांचे परिणाम सूक्ष्म आणि प्रभावी आहेत.* श्रीसूक्त जसे प्रापंचीक सुविधा प्राप्त करून देते तसेच पारमार्थिक वैभवही देते. पारमार्थिक उपासनेत त्या देवतेची भेट होणे महत्त्वाचे असते. *देवासाठी निर्भेळ उपासना करणारा उपासक क्वचित आढळतो. या उपासनेने प्राप्त होणारे फळ कायम टिकणारे असते. एवढेच नाही तर त्या उपासनेचा फायदा पुढील पिढीलाही मिळतो.* जेथे सौंदर्य, विद्वत्ता, सत्ता, चैतन्य आहे तेथे या देवतेचे वसतीस्थान आहे. साधकाच्या अंतःकरणातील स्फूर्ती या देवतेचे वसतीस्थान आहे. शूचिर्भूत झाल्यावर या उपासनेला प्रारंभ करावा. त्यात ध्यान महत्त्वाचे ठरते. देवीची मूर्ती हृदयात निर्माण करून तिची प्रतिष्ठा करावी. श्रीसूक्ताच्या एकेका मंत्राने मनाने तिची पूजा करावी. *१६ आवर्तने रोज करावी* त्यायोगे मनावर उत्तम प्रकारचे सुसंस्कार घडून सद्गुण अंगी वाढू लागतात. सांसारिक लिप्तता कमी होते. पारमार्थिक बंधता आवडू लागते. *यामधील महत्त्वाचा अडथळा म्हणजे मी उपासक आहे हा अहंकार निर्माण होणे. तो अधोगतीला नेतो म्हणून याकडे दुर्लक्ष करावे.* सिद्धींचा त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वतःच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. यामध्ये दुसऱ्यासाठी काही करणे चूक ठरते. उदा. ब्राह्मणाकडून जप करून घेणे या व्यवहाराला या उपासनेत स्थान नाही. चैत्र, अश्विन, पौष या महिन्यांमध्ये देवीची उपासना केली जाते. *- अक्कलकोट स्वामीदर्शन, दिवाळी अंक २००१ मधून साभार.* 🚩🙏📿 *श्री स्वामी समर्थ* 📿🙏🚩

31 total episodes available

Deep-dive analytics for Er Priti More

Frequently asked questions

Have a different question and can't find the answer you're looking for? Reach out to our support team by sending us an email and we'll get back to you as soon as we can.

What is Er Priti More?

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल.

या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे. मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल.

तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता https://www.youtube.com/@PritiMore

धन्यवाद!

How often does this podcast release new episodes?

This podcast updates daily.

Where can I listen to this podcast?

This podcast is available on 4 platforms including Apple Podcasts, Spotify, and more. You can also use the RSS feed directly.

Does this podcast accept guests?

No, this podcast does not typically feature guests.

Legal Disclaimer

Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.

All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.

We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.

While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at hey@podengine.ai for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.

By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.