मराठीतल्या मनापासून केलेल्या गप्पा, जीवन, माणसांची नाती, लहानपणच्या आठवणी, स्वप्न आणि आपल्या मनात राहून गेलेल्या काही खास गोष्टी. 'गप्पा गोष्टी, मनातल्या' (Gappa Goshti, Manatlya) या मराठी पॉडकास्टमध्ये आपण रोजच्या जगण्यातील भावनिक प्रवास, नातेसंबंध आणि सुवर्णकाळातील आठवणींना उजाळा देणार आहोत.
Welcome to Gappa Goshti, Manatlya — a dedicated Marathi audio podcast exploring life stories, deep nostalgia, relationships, and emotional life philosophy. Subscribe/Follow for heartwarming weekly episodes.
#marathipodcast #gappagoshti #marathistories #audioshow #marathitalks #podcastinmarathi
एक छोटासा लाल लवंगी फटाका… आणि त्याचा आवाज मात्र आख्ख्या गल्लीत घुमणारा!
आठवतेय का ती दिवाळी? घराची साफसफाई, आईच्या हातचा फराळ, लक्ष्मी रोडवरची खरेदी, आकाशकंदील लावण्याची धडपड, फटाक्यांचे आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरी सहजपणे जाणं-येणं…
त्या दिवाळीत पैसा कदाचित कमी होता, पण उत्साह आणि एकत्र असण्याचा आनंद भरपूर होता.
आज दिवाळी साजरी करण्याची पद्धत बदलली आहे. घरं मोठी झाली, गल्ल्या फ्लॅटमध्ये बदलल्या, फराळ ऑनलाइन येऊ लागला… पण त्या जुन्या दिवाळीच्या आठवणी अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तशाच जपून आहेत.
या भागात पुन्हा एकदा जाऊया त्या जुन्या दिवाळीत. लवंगी फटाक्यापासून चिमणीपर्यंत, आईच्या फराळापासून आकाशकंदिलापर्यंत… आणि त्या माणसांपर्यंत, ज्यांच्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी वाटायची.
तुमचा आवडता फटाका कोणता होता? आणि दिवाळीची कोणती आठवण आजही मनात ताजी आहे?
ऐका, आठवा आणि तुमच्या आठवणी आम्हालाही सांगा!
गप्पा गोष्टी, मनातल्या – भाग ३३
शुभ दीपावली! 🪔
16 Oct 2026
Ep 32: दारूचे अफाट आणि दैवी फायदे | Daru che Phayde
"आज गाडी तुझा भाऊ चालवणार..."
हा डायलॉग ऐकला की आपल्या तोंडावर कसा सहजपणे हसू येतो नाही का?
नमस्कार मंडळी! 'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या बत्तिसाव्या भागात आपले स्वागत. बरेच दिवसांपासून हा विषय डोक्यात 'टंगल मंगल' करत होता, आणि आपल्या व्हॉट्सॲप सर्व्हेमधील बहुमतानुसार आज आपण थेट हात घालतोय एका अत्यंत ज्वलनशील आणि तात्त्विक विषयावर— "दारू आणि आपली तिची असलेलं नातं!"
या पहिल्या भागात आपण कोणतंही लेक्चर किंवा ज्ञान न देता, अगदी हसतखेळत बोलणार आहोत **दारू पिण्याच्या त्या दैवी आणि अफाट फायद्यांवर**—जसे की पोलादी इच्छाशक्ती, भाऊ-बंदकी, थेट 'छत्रपती' होण्याचे झटके आणि अचानक अंगात येणारी मल्टिटॅलेंटेड क्षमता!
हेडफोन्स लावा आणि अनुभवा अस्सल पुणेरी गप्पांची ही नवी सफर!
🎙️ पॉडकास्ट आवडल्यास नक्की **Follow** आणि **Share** करा! तुमचे किस्सा किंवा अभिप्राय मला कमेंट्स किंवा मेसेज करून नक्की सांगा.
#MarathiPodcast #GappaGoshtiManatlya #AjayDusane #MarathiTalk #PuneVibes #MarathiHumor #PodcastLife
11 Oct 2026
Ep 31: कवटी 💀🎸 | Gappa Goshti Manatlya
कमिन्सचे दिवस, हेवी मेटल म्युझिक, गाडीवरच्या कवट्या... असा आमचा मित्र पराग पोतदार ऊर्फ 'कवट्या महाकाळ'! 🎸
'गप्पा गोष्टी मनातल्या'च्या या एकतीसाव्या भागात, अजय घेऊन आला आहे एका अशा अतरंगी, हुशार आणि अस्सल मित्राची गोष्ट, ज्याने आयुष्यात कोणतीही मोठी भाषणं न देता नुसत्या आपल्या असण्याने जगण्याची नवी नजर दिली. कमिन्सच्या क्युबिकलपासून ते मुंबईच्या सोळा वर्षांच्या संघर्षानंतर पुण्यात परतल्यावर झालेल्या त्या फोनपर्यंतची एक अत्यंत जिव्हाळ्याची आणि भावूक सफर.
हेडफोन्स लावा आणि अनुभवा मैत्रीच्या एका वेगळ्याच ओळखीचा प्रवास!
🎙️ पॉडकास्ट आवडल्यास नक्की Follow आणि Share करा. तुमच्या आयुष्यातला असा 'कवट्या महाकाळ' कोण आहे, हे आम्हाला नक्की सांगा.
#MarathiPodcast #GappaGoshtiManatlya #AjayDusane #Nostalgia #MarathiTalk #PuneMumbai #Friendship
Reach and audience
Public platform figures. Ratings count people who left a rating, not total listeners.
Spotify
5.0 / 5
10 ratings
Contact Gappa Goshti, Manatlya
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Gappa Goshti, Manatlya?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine