तुला माहितीये त्या दिवशी काय झालं.. अस जरी कोणी म्हटलं तरी आपले कान उभे राहतात. कारण किस्से, गोष्टी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजीच्या राजा-राणीच्या गोष्टींपासुन मोठमोठ्या कादंबरीकारांच्या कल्पनाविस्तारात रमतोच आपण..
लिखाण दोन प्रकारचं असतं..
एक, जे आपण वाचु शकतो आणि स्वत:च्या वैचारीक कुवतीप्रमाणे रंजन करू शकतो..
दुसरे, कोणीतरी शब्दांना छान लयीत ऐकवुन.. डोळ्यासमोर चित्र उभा राहतील अशी अनुभूती देणारं...
आम्ही दुसरा पर्याय निवडला... गोष्टी ऐकवण्याचा.
इच्छा एकदम साधी... ऐकणाऱ्यानं जीवाचे कान केले की आपण शब्दांचा पसा त्याच्या झोळीत रिकामा करायचा.
आता तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आहोत.
कवितेमागची कथा..
अनेक वर्ष सोबत संसार केलेल्या दोघांपैकी एकजण अचानक साथ सोडून गेल्यानंतर दुसऱ्याची अवस्था चावी हरवलेल्या कुलूपासारखी होते. कुलूप आणि चावी, दोहोंपैकी एक जरी गहाळ झाला तरी दुसरा अस्तित्वहीन आणि उपयोगशुन्य होतो. अडगळ.
13 Sept 2021
Photogenic
गोरं-गोमटं रंग-रूप ही सुंदरतेची व्याख्या नाही. कधी कधी असण्या पाठीमागच्या गोष्टी दिसण्या मुळे ही तुम्हाला ती व्यक्ती सुंदर वाटुच शकते. कॅमेरा हा आरसा नसुन माध्यम आहे आठवणी जमा करण्याचं.
29 Aug 2021
Connectivity
नोकरी व्यवसाय आणि कुटूंब कर्तव्य याचा समतोल साधताना कर्त्या व्यक्तिला आणि त्या गृहिणीला सारख्याच मानसिक स्थितीतुन जावं लागतं. दोघांचा हेतु आणि योगदान सारखच असलं की नातं जिवंत राहतं.
थोडा देवावर आणि थोडा दैवावर ‘विश्वास’ असला कि कनेक्टिवीटी टिकून राहते.
16 Aug 2021
Smile Please
आपली माणसं घरातच शोधायची नसतात फक्त, बाहेरच्या जगातही ती सापडू शकतात. कोरोना मध्ये आपलं कुटुंब हरवून बसलेल्या माणसाची हृदयस्पर्शी कथा.
लेखक: प्रा. कौस्तुभ केळकर
अभिवाचक: विराज मुनोत
8 Aug 2021
धर्म
खरा धर्म कोणता ?
कारण कोणासाठी धर्म अफूची गोळी ठरला तर कोणाला तो तांबडा फॉस्फरस वाटला....
तर कोणाला तो जीवन जगण्याची कला
मात्र, खरा धर्म तोच ठरेल
जो धर्म हा विसंवादी जगात संवाद निर्माण करणारे माध्यम बनेल......
कवितेमागची कथा :- 'धर्म'
लेखक:- प्रा. शशिकांत शिंदे
अभीवाचक:- प्रसाद बेडेकर
24 Jul 2021
म्हातारी शिवाय
घरातल्या म्हातारा म्हातारी चे रूपांतर ग्रँड फादर आणि ग्रँड मदर मध्ये ज्या वेळेला झालं त्या वेळेला हळूहळू त्यांचं आपल्या कुटुंबातले अस्तित्व सुद्धा कमी व्हायला लागले,
'त्यांच्या शिवाय' आणि 'त्यांच्यासह' याच्यातला फरक ठळकपणे आपल्याला जाणवायला लागला कोणत्याही सृर्जनशील कलाकारासाठी असे विषय नेहमीच नवनिर्मिती साठी पोषक ठरतात...
कवितेमागची कथा
लेखक :- प्रा.शशिकांत शिंदे
अभिवाचन :- प्रसाद बेडेकर
18 Jul 2021
कलर कोड
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांचं नेहमीच एक वेगळं महत्त्व असतं काही रंग आपलं आयुष्य रंगतदार बनवतात तर काही रंग पाहुन नजर करडी होते, अशाच एका रंगाची ही कथा.
4 Jul 2021
गोकुळ
कोणत्याही सृजनात्मक गोष्टीच्या मागे नेहमीच एक कथा घडत असते
एखाद्या कवीला एखादी कविता कशी सुचते?
काय घडत असत त्यामागे ?
काय विचार करत असतो तो कवी ?
आसपास घडणाऱ्या घटनांचा त्याच्यावर काय परिणाम होत असतो ?
ऐकूयात या आजच्या पॉडकास्ट मधून
*कवितेमागची कथा*
लेखन -: प्रा. शशिकांत शिंदे अभिवाचन -: केतन धस
27 Jun 2021
जादू नाट्यसंगीताची
आद्य नाटककार पंडित विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर सादर केलेल्या पहिल्या संगीत नाटकापासून ते आज सव्वाशे वर्षांनंतरही नाट्यसंगीत हे कायमच मराठी रसिकांच्या मनातलं आपलं खास आणि अढळ स्थान टिकवून आहे. त्यामागचं नेमकं कारण काय असावं ?
त्याचीच ही गोष्ट.
जादू नाट्यसंगीताची...
लेखन आणि अभिवाचन
सौ अमृता बेडेकर
19 Jun 2021
देवी
प्रत्येक स्त्री *देवीच* असते
फक्त त्याची जाणीव व्हायला हवी
एकदा ती झाली ना मग सगळ्यांना ती तथास्तु म्हणते
त्या देवीच्या दर्शनासाठी मग सगळेच नतमस्तक होतात
देवी
लेखक :- कौस्तुभ केळकर
अभिवाचन -: प्रसाद बेडेकर
12 Jun 2021
गोष्ट - यशस्वी उद्योजकांची
400 पेक्षा जास्त सीए घडवणारे,
विद्यार्थीप्रिय आणि सतत नावीन्याचा ध्यास घेऊन शिक्षणक्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवणारी एक असामान्य जोडी
सीए संदीप देसरडा आणि
सीए प्रसाद भंडारी
5 Jun 2021
नांदीची गोष्ट
मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पर्व म्हणजे *संगीत नाटक* या संगीत नाटकाने मराठी रंगभूमीला अनेक उत्तमोत्तम लेखक गीतकार दिग्दर्शक अभिनेते आणि अभिनेत्री दिल्या त्यांच्या असामान्य प्रतिभेने मराठी रंगभूमी झळाळून गेली. मराठी नाट्य संगीताने तर अनेक विक्रम प्रस्थापित केले. याच नाट्यसंगीतामध्ये असणाऱ्या अनेक गमतीजमती, गोष्टी मात्र काळाच्या ओघात काहीशा पुसट झाल्या. ऐकूयात आमच्या आजच्या पॉडकास्ट मध्ये याच सुवर्ण काळातील संगीत नाटकाच्या प्रारंभी म्हटल्या जाणाऱ्या *नांदी ची गोष्ट*
लेखन आणि अभिवाचन - सौ. अमृता बेडेकर
29 May 2021
माहेरवाशीण
काही नाती आपल्याला आयुष्यात एका वेगळ्याच वाटेवरुन जायला भाग पाडतात. त्या टप्प्यावर आपल्याला त्या नात्याचं एक वेगळाच महत्व जाणवतं.....
अश्याच एका वेगळ्या आणि अलवार नात्याची ही अनोखी कथा....
22 May 2021
Secondhand
बहुदा अनेक घरात असंच होत असतं....
घरात दोन भावंडं असली की मोठ्याला नेहमी नवीन गोष्टी मिळतात आणि त्याच्या वापरलेल्या गोष्टी मग धाकट्याला.
खरं तर यात दडलेलं असतं प्रेम, आणि जिव्हाळा.
मोठयाने काळजीने सांभाळून गोष्टी वापरायच्या आणि मग त्या लहान भावाला द्यायच्या यातूनच लहानपणापासून आपल्या छोट्या भावाची जबाबदारी मोठा भाऊ घेत असतो.
पण या गोष्टी जेंव्हा घरात येणारी तिसरी व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून पाहते तेंव्हा....
तेव्हा काय येत असेल तिच्या मनात ??
ऐकूयात या आजच्या कथेतून...
8 May 2021
पत्र
कधी कधी वर वर घट्ट वाटणारी नाती आतूनही तशीच असतात ??
आई वडिलांकडुन अनेकदा त्यांचे काही विचार,अनुभव मुलांवर लादले जातात.
हेतु नक्कीच चांगला असला तरी पिढी वेगळी असल्याने परिस्थिती वेगळी असते.
काही वेळा मुलांना पालकांना समजावणं जड जात ,मन मारलं जातं.
समोरा समोर काही गोष्टी नाहीच बोलता येत, म्हणुनच पत्र लिहीणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.
हे सुद्धा असेच एक पत्र आहे एका पिढीचं दुसऱ्या पिढीला
नक्की ऐका, कदाचित तुम्हाला तुमचे स्वत:चे ही काही संदर्भ यात सापडतील.
1 May 2021
गोष्टी बिष्टी
या महाराष्ट्र दिनी
मराठी मातीतला, मराठी साहित्याचा साज आणि मराठीच बाज असलेला.. पॅाडकास्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. “गोष्टी बिष्टी”
मराठीचं पुढचं पाऊल.. Audio Podcast च्या क्षेत्रात.
काही गोष्टींना visuals ची गरज असते.. नक्कीच, पण ज्या गोष्टींना ते नसतं तीत कल्पना विस्ताराच्या सीमा अमर्याद असतात.
Contact GoshtiBishti
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of GoshtiBishti?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine