#कोठे सीता जनकनंदिनी #गीत रामायण भाग 32##जयश्रीराम!@harshaseartreat
याचका थांबू नको दारात! अशा प्रकारे सीतेच्या आक्रोशाला न जुमानता रावणाने लंकेचा रस्ता धरला.इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत आणि लक्ष्मण त्यांच्या दृष्टीस पडतो.तेव्हा प्रभू श्रीरामांच्या हृदयात चर्र होतं.काहीतरी अशुभ घडलं असावं असं त्यांना वाटतं. दोघे आश्रमामध्ये येतात. पर्ण शाळेमध्ये सीता नव्हती.साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम आजूबाजूला हिंदू लागले, शोध करू लागले आणि व्याकुळतेने सीतेला हाका मारू लागले आणि काय म्हणू लागले ऐकू या.......
#कोठे सीता जनकंदिनी! गीत रामायण भाग 32
19 Sept 2025
#याचका थांबू नको दारात. #गीत रामायण भाग 31. #जय श्रीराम
"मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा"या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले .रामाचा बाण वर्मी लागताच तो मायावी मारीच "हा सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव" असं मानवी वाणीने ओरडला.त्यामुळे सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतीवेश धारण केलेला रावण पुढे झाला आणि तिच्याशी लगट करू लागला .तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वरांनी काय बजावू लागली ?.....
ऐकूया .....
"#याचका थांबू नको दारात"|#गीतरामायण |भाग 31
#जयश्रीराम|@harshaseartreat
26 Apr 2025
तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा! गीत रामायण- भाग 30
'सूड घे त्याचा लंकापती 'अशाप्रकारे शूर्पणखेनं चेतविलेला दशानन रावण प्रभू श्रीरामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचे हरण करायच्या उद्योगाला लागतो त्यासाठी त्यानं कपटाने सुवर्ण मृगाचे रूप धारण करायला लावलेल्या मारीचाचं अभूतपूर्व रूप पाहून सीतेला अतिशय मोह होतो आणि ती लाडीकपणाने प्रभू श्रीरामांना काय म्हणते ऐकूया....
'तोडिता फुलें मी सहज पाहिला जाता
मजा आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा'
#गीत रामायण भाग 30
#जय श्रीराम!
Reach and audience
Public platform figures. Ratings count people who left a rating, not total listeners.
Spotify
5.0 / 5
3 ratings
Contact Harsha's Ear Treat.
Guest appearances
Books guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Harsha's Ear Treat.?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine